‘२६/११’च्या आतंकवादी आक्रमणातील हुतात्म्यांना राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडून मानवंदना !
मुंबई – पाकिस्तानधार्जिण्या आतंकवाद्यांनी २६/११ या दिवशी मुंबईवर केलेल्या आक्रमणात हुतात्मा झालेल्या पोलिसांच्या स्मृती स्मारकावर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. २६ नोव्हेंबर २०२३ या दिवशी या आक्रमणाला १५ वर्षे पूर्ण झाली. मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या प्रांगणातील हुतात्मा स्मारकाच्या ठिकाणी श्रद्धांजली वहाण्यात आली. या वेळी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.