माजी आमदार नितीन शिंदे यांच्याकडून अफझलखानवधाच्या शिल्पाची पहाणी !
पुणे – छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रतापगड येथे अफलखानाचा कोथळा काढून त्याचा वध केला. हा पराक्रम लवकरच शिल्परूपातून शिवभक्तांसमोर येणार असून याचे काम पुणे येथे चालू आहे. सांगली येथील माजी आमदार, तसेच ‘श्री शिवप्रतापभूमी मुक्ती आंदोलना’चे निमंत्रक श्री. नितीन शिंदे आणि त्यांचे सहकारी यांनी पुणे येथे जाऊन त्याची पहाणी केली. या प्रसंगी अधिवक्त्या (सौ.) स्वाती शिंदे उपस्थित होत्या. हे शिल्प प्रतापगड येथे बसवेपर्यंत आपला पाठपुरावा चालू राहील, असे श्री. नितीन शिंदे यांनी या प्रसंगी सांगितले.