जम्मू-काश्मीर येथून अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण करणारे २ धर्मांध अटकेत !

नागपूर पोलिसांची कारवाई !

प्रतिकात्मक छायाचित्र

नागपूर – जम्मू-काश्मीर येथील मुदस्सीर हुसेन महंमद हुसेन (वय १९ वर्षे) आणि यासीर हुसेन मोहम्मद यासीन (वय १९ वर्षे) यांनी तेथील १५ वर्षीय अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण केले. नंतर तिला नागपूर येथे आणले. सीताबर्डी परिसरात फिरत असतांना पोलिसांनी तिघांनाही थांबवून चौकशी केली असता सत्य समोर आले. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपी तरुणांना अटक केली आहे, तर मुलीला शासकीय वसतीगृहात ठेवण्यात आले आहे. ते दोघे तिला भाग्यनगर येथे नेणार होते. (हिंदु मुलींना फूस लावून पळवणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई व्हायला हवी ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • हिंदु मुलींनो, धर्मांधांच्या तावडीत जाऊन आपले आयुष्य उद्ध्वस्त करून घेऊ नका !
  • हा ‘लव्ह जिहाद’चा प्रकार नसेल कशावरून ?