Victims Of Stampede : कोचीन विश्‍वविद्यालयातील चेंगराचेंगरीमध्ये ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू, तर ६० जण घायाळ !

वार्षिक कार्यक्रमाच्या स्थळी अचानक गर्दी वाढल्याने झाली चेंगराचेंगरी !

कोचीन विश्‍वविद्यालयात चालू असलेल्या वार्षिक कार्यक्रमाच्या वेळी गर्दी वाढल्याने झाली चेंगराचेंगरी

कोची (केरळ) – येथील कोचीन विश्‍वविद्यालयात चालू असलेल्या वार्षिक कार्यक्रमाच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर ६० जण घायाळ झाले. मृतांमध्ये २ मुले आणि २ मुली आहेत, अशी माहिती राज्याच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी दिली. घायाळांपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या मृतांची ओळख पटलेली नाही. पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत.

 (सौजन्य : Times Of India)

येथील स्टेडियममध्ये कार्यक्रम चालू असतांना गायिका निकिता गांधी या गाणे गात असतांना गर्दीमध्ये अचानक वाढ झाली.

चेंगराचेंगरीचे बळी

विद्यार्थ्यांव्यतिरिक्त काही बाहेरचे लोकही येथे पोचले होते. याच वेळी पाऊस चालू झाल्याने बाहेरील काही लोकही येथे आसर्‍यासाठी आले. यामुळे येथे चेंगराचेंगरी झाली, असे सांगितले जात आहे.