शिबिराच्या माध्यमातून स्वरक्षणाचे महत्त्व लक्षात आले ! – शिबिरार्थी युवती
हिंदु जनजागृती समितीचे युवतींसाठी विनामूल्य स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर !
निपाणी – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निपाणी येथील महर्षी वाल्मिकी भवन येथे १९ नोव्हेंबरला युवतींसाठी विनामूल्य स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. या शिबिरामध्ये भारताचा शौर्यशाली इतिहास, युवती-महिला यांची सद्य:स्थिती आणि त्यांना येणार्या अडचणींवर कशा प्रकारे मात करावी ? हिंदु धर्माचे महत्त्व यांसह अन्य विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. या प्रसंगी स्वरक्षणाच्या पद्धती शिकवण्यात आल्या. ‘शिबिराच्या माध्यमातून स्वरक्षणाचे महत्त्व लक्षात आले’, असे उपस्थित युवतींनी सांगितले.
काही युवतींनी स्वरक्षण प्रशिक्षणवर्गाची मागणी केली, तर दोघी युवतींनी समितीच्या कार्यात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. याचा लाभ अनेक युवतींनी घेतला.