नगर येथे २ ठिकाणी केलेल्या कारवायांमध्ये ७३ गोवंशियांना मिळाले कत्तलीपासून जीवदान !

गोवंश हत्याबंदी कायद्याच्या प्रभावी कार्यवाहीची आवश्यकता सांगणार्‍या घटना !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

अहिल्यानगर – येथे कत्तलीसाठी गोवंशियांची वाहतूक होणार असल्याची माहिती मानद पशूकल्याण अधिकारी ऋषिकेश भागवत यांना मिळाल्यावर गोरक्षकांनी पोलिसांच्या साहाय्याने ३१ गोवंशियांची सुटका केली. २१ नोव्हेंबर या दिवशीही ४२ गोवंशियांना कत्तलीपासून वाचवले. यात ऋषिकेश भागवत, सहकारी गोरक्षक अभिजित चव्हाण, ऋषी चावरे आणि गौरव शिंदे यांचे सहकार्य लाभले. या प्रकरणी पोलिसांनी रमजान चौघुले याच्यावर गुन्हा नोंद केला आहे. दुसर्‍या कारवाईत जखणगावमध्ये गोरक्षकांनी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला; परंतु वाहनचालकाने गोरक्षकांच्या गाडीला धडक देऊन ऋषिकेश भागवत यांच्या हातावर रॉडने आक्रमण केले. वाहनचालक पळाल्याने गाडी रस्त्याच्या बाजूच्या खड्ड्यात उलटली. गोरक्षकांनी जिवाची पर्वा न करता पोलिसांच्या साहाय्याने गोवंशियांना बाहेर काढले. घायाळ गोवंशियांवर गोशाळेत औषधोपचार केले. या वेळी ‘अखिल भारत कृषी गोसेवा संघा’चे प्रदेशाध्यक्ष श्री. मिलिंद एकबोटे, बजरंग दल नगर जिल्हा संयोजक कुणाल भंडारी यांनी पुष्कळ सहकार्य केले. सनी थोरात, साहिल पवार नाना मोरे, दीपक फुलढहाळे, दिनेश हिरगुडे, जय जाधव, शिवराज पवार, विनायक वर्णुक, अविनाश सरोदे यांनी मोलाचे परिश्रम घेतले.

संपादकीय भूमिका :

गोरक्षकांप्रमाणे पोलिसांनीही प्राणपणाने प्रयत्न केल्यास गोहत्या निश्चितच रोखल्या जातील !