दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप :मद्यपीकडून आक्रमण !; तरुणीवर लैंगिक अत्याचार करणारे ३ धर्मांध अटकेत !
मद्यपीकडून आक्रमण !
ठाणे – मित्राला भेटून घरी परततांना एका मद्यपीने हातातील प्लास्टिक पाईपने प्रशांत घरत (वय ३८ वर्षे) यांना मारहाण केली. घरत यांच्या डोळ्याला जखम झाली आहे. अनोळखीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
अशा वासनांधांना कारागृहात डांबायला हवे !
तरुणीवर लैंगिक अत्याचार करणारे ३ धर्मांध अटकेत !
येवला (नाशिक) – अश्लील छायाचित्र आणि व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देत ३ तरुणांनी २२ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केला. वासीम सय्यद, आरीफ खान, मुस्तकीम उपाख्य राजू सय्यद अशी त्यांची नावे आहेत. या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा नोंदवण्यात येऊन त्यांना अटक केली आहे. या धर्मांधांनी तरुणीकडून पैसेही उकळले.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाचा कायापालट होणार !
मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या स्थानकाचा लवकरच कायापालट होणार आहे. प्रत्यक्ष कामाला प्रारंभ करण्यात आला असून त्यासाठी २ हजार ४०० कोटी खर्च केले जाणार आहेत. ‘स्थानकाचा पुनर्विकास करतांना हेरिटेज इमारतींना धक्का लागू देणार नाही’, असे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले. देशातील १ हजार २५० रेल्वे स्थानकांचाही टप्प्याटप्प्याने पुनर्विकास करण्यात येणार आहे.
अशा फसव्या लोकांकडून सर्व संपत्ती वसूल करायला हवी !
‘मेसर्स हायवे कन्स्ट्रक्शन’ आस्थापनाचे रोमिन छेडा यांना अटक !
मुंबई महापालिकेची सहा कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण
मुंबई – ‘मेसर्स हायवे कन्स्ट्रक्शन’ आस्थापनाचे रोमिन छेडा यांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. कोरोना महामारीच्या काळात प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभारणीचे काम अर्धवट असतांना ते पूर्ण झाल्याचे सांगून मुंबई महापालिकेची ६ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी नागपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून त्याचे अन्वेषण आर्थिक गुन्हे शाखा करत आहे.