विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन पुढे जाण्याची शक्यता !
मुंबई – ७ डिसेंबरपासून चालू होणारे विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन ४ दिवस पुढे ढकळले जाण्याची शक्यता आहे. अधिवेशन ११ डिसेंबरपासून चालू होण्याची शक्यता आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याविषयी सुतोवाच केले आहे; मात्र याविषयीचा अंतिम निर्णय विधीमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत होईल, असे नार्वेकर म्हणाले आहेत.
विधीमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक २८ किंवा २९ नोव्हेंबर या दिवशी होणार आहे. शिवसेनेच्या आमदारांच्या पात्रतेविषयीची सुनावणी ११ ते २२ डिसेंबर या कालावधीत नागपूर येथे होणार आहे. त्याला अनुसरून अधिवेशन ११ डिसेंबरपासून चालू करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरि झिरवळ यांनी मात्र प्रशासकीय कागदपत्रांची पूर्तता झाली नसल्यामुळे अधिवेशन पुढे ढकलले जात असल्याचे पत्रकारांशी बोलतांना म्हटले.