आश्रम कि श्रीहरीचे हे गोकुळ ।
‘सनातनच्या ११३ व्या (व्यष्टी) संत (पू.) श्रीमती विजया दीक्षित यांचा आज कार्तिक शुक्ल त्रयोदशी (२५.११.२०२३) या दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांना आश्रमाविषयी स्फुरलेल्या कविता येथे देत आहोत.
पू. (श्रीमती) विजया दीक्षित यांना ९१ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
आश्रम (टीप १) कि श्रीहरीचे हे गोकुळ ।
साधक देती अवीट प्रेमा ।
तशाच प्रेमळ सर्व साधिका ।
वाटे जणू हे गोप-गौळणी ।। १ ।।
आले गोकुळी सेवा कराया ।
हरिच (टीप २) आला उतरूनी वैकुंठा ।
जागृत करण्या सर्व जगाला ।
आशीर्वचन देती सकला ।। २ ।।
बिंदाई (टीप ३) अन् अंजलीताई (टीप ४) झाल्या सकलांच्या माता भगिनी ।
वाटे उतरला स्वर्गच भुवनी ।
आमुचे गोकुळ असेच राहो ।
शीघ्रची हिंदु राष्ट्र होवो ।। ३ ।।
टीप १ – रामनाथी, गोवा येथील सनातनचा आश्रम
टीप २ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
टीप ३ – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ
टीप ४ – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
– (पू.) श्रीमती विजया दीक्षित, बेळगाव (२०.१२.२०२२)
गुरुदेवा, शेवट आपुल्या चरणी व्हावा ।
माझे जीवन माझे गाणे ।
चिंतनातच सदा रहाणे । आनंदाने सदा बहरणे ।। १ ।।
उत्साहाचा होऊनी सागर ।
उद्योगातच बुडून जाणे । माझे जीवन माझे गाणे ।। २ ।।
प्रीती माझ्या सदैव हृदयी । निरपेक्षता ठायी ठायी ।
प्रेम, त्याग अन् सेवा करूनी । सुख-दुःखाच्या अतीत होणे ।। ३ ।।
अडी-अडचणी वाट अडविती । नीटच (टीप) आहे धरली ती ।
निर्झरासम निर्मळ होऊनी । जाणे खळाळत सदा पुढे ।। ४ ।।
हे गुरुदेवा, तुम्हा विनविते । असेच राहो जीवन माझे ।
शेवट आपुल्या चरणी व्हावा । मनीची एकच आस आहे ।। ५ ।।
नाम आपुले ओठी राहू दे । मूर्तीही डोळ्यांत साठू दे ।
नको पुन्हा जन्माला येणे । जीवनपुष्प आपुल्या पदी वाहिले ।। ६ ।।
टीप : निर्धाराने
– (पू.) श्रीमती विजया दीक्षित, बेळगांव (२३.१२.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |