अमली पदार्थांच्या व्यसनासाठी पोटच्या मुलांना विकणार्या धर्माध दांपत्याविरोधात गुन्हा नोंद !
मुंबई – अमली पदार्थांच्या व्यसनासाठी पैसे मिळावेत; म्हणून पोटच्या दोन मुलांना अंधेरीतील दांपत्याने विकले. मुलांच्या आत्याला हा प्रकार समजल्याने प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणी अंधेरी पोलिसांनी शब्बीर खान, त्याची पत्नी सानिया, उषा राठोड आणि शकील मकरानी यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. आरोपी दांपत्याने २ वर्षांचा मुलगा ६० सहस्र रुपयांना, तर एक मासाची मुलगी १४ सहस्र रुपयांना विकली. यामागे लहान मुलांची विक्री करणारी मोठी टोळी कार्यरत असल्याचा संशय आहे. गुन्हे शाखा या प्रकरणाचे अन्वेषण करत आहे.
संपादकीय भूमिका :व्यसनासाठी कोणत्याही थराला जाणारे धर्मांध ! |