कोरोना काळातील ४ सहस्र कोटी रुपयांचा हिशोब मुंबई महापालिकेकडे उपलब्ध नाही !
माहिती अधिकारातून धक्कादायक वास्तव उघड !
मुंबई – मुंबईतील एका कार्यक्रमात महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी कोरोना महामारीच्या काळात मुंबई महानगपालिकेने ४ सहस्र कोटींचा खर्च केला असल्याचे म्हटले होते; पण ४ सहस्र कोटींच्या खर्चाचा तपशील पालिकेकडे उपलब्ध नाही, हे माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सांगितले आहे. त्यांनी या खर्चाच्या अहवालाची प्रत माहिती अधिकारांतर्गत मागवली होती.
या खर्चाच्या संदर्भात ईडीकडूनही चौकशी चालू आहे. ‘या खर्चाची तपशीलवार माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावी’, अशी मागणी माहिती अधिकाराच्या अहवालात करण्यात आली आहे.
संपादकीय भूमिका :याविषयी मुंबई महापालिकेला काय म्हणायचे आहे ? हा हिशोब कधीपर्यंत सादर करणार, तेही पालिकेने सांगावे ! |