प्रेमळ आणि सेवेची आवड असलेला ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचा गया (बिहार) येथील कु. योगेश रंजीत प्रसाद (वय १२ वर्षे)!
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. योगेश प्रसाद हा या पिढीतील एक आहे !
‘वर्ष २०२० मध्ये ‘कु. योगेश रंजीत प्रसाद महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आला असून त्याची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२३ मध्ये त्याची आध्यात्मिक पातळी ६२ टक्के झाली आहे. त्याच्यावर पालकांनी केलेले योग्य संस्कार, त्याची साधनेची तळमळ आणि त्याच्यातील भाव यांमुळे आता त्याची साधनेत प्रगती होत आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१८.११.२०२३) पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
१. अभ्यासू वृत्ती
‘योगेश त्याला शाळेत दिला जाणारा गृहपाठ मनापासून पूर्ण करतो. त्याला प्रत्येक सेवा शिकण्याची पुष्कळ तळमळ असते आणि तो अल्प प्रयत्नांतच ती सेवा शिकून घेतो.
२. प्रेमभाव
घरात कुणी रुग्णाईत असल्यास योगेश त्यांची काळजी घेतो. तो रुग्णाईत व्यक्तीची विचारपूस करतो आणि तिची सेवा करण्याचा प्रयत्न करतो.
३. व्यष्टी साधनेचे गांभीर्य
तो त्याच्याकडून झालेल्या चुका वहीत लिहितो. त्या वहीला चंदनाचा सुगंध येतो.
४. सेवेची आवड
४ अ. वडिलांना सेवेत साहाय्य करणे : तो माझ्या (श्री. रंजीत प्रसाद) समवेत ‘सनातन प्रभात’चे वितरण करायला येतो. त्या वेळी ‘माझी सेवा लवकर होते आणि मला सेवेतून अधिक आनंदही मिळतो’, असे माझ्या लक्षात आले.
४ आ. विविध सेवा करणे : तो ग्रंथप्रदर्शनाच्या सेवेत मनापासून सहभागी होतो. तो ‘ऑनलाईन’ धर्मशिक्षणवर्ग आणि सत्संग या वेळी तांत्रिक बाबी सांभाळतो. त्याला ‘ट्विटर’संबंधित सेवेचीही पुष्कळ आवड आहे.
४ इ. गुरुकार्य होण्याची तळमळ : गया येथे सेवेसंबंधी उपक्रम अधिकाधिक राबवण्याची त्याची तळमळ असते.
४ ई. दायित्व घेऊन सेवा करणे : वर्ष २०२३ मध्ये गया येथे गुरुपौर्णिमा साजरी झाली. तेव्हा योगेशने संगणकीय आणि अन्य सर्व तांत्रिक (टेक्निकल) सेवांचे दायित्व घेऊन त्या पूर्ण केल्या. त्याने केलेल्या सेवांसंदर्भात अन्य साधकांना पाठपुरावा करावा लागला नाही.
५. आईला साधनेत साहाय्य करणे
माझ्या (सौ. आशा) मनात कुटुंबातील अन्य सदस्यांविषयी नकारात्मक विचार आल्यास तो मला योग्य दृष्टीकोन देतो आणि ‘दुसर्यांना कसे समजून घ्यावे ?’ तेही समजावून सांगतो.
‘गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेनेच आम्हाला योगेशसारखा मुलगा मिळाला आहे’, त्याबद्दल आम्ही त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– सौ. आशा रंजीत प्रसाद (कु. योगेशची आई) आणि श्री. रंजीत प्रसाद (कु. योगेशचे वडील), गया, बिहार. (३१.८.२०२३)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता. |