दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : कोयत्याने आक्रमण करणार्या तिघांविरोधात गुन्हा नोंद !; विद्यार्थिनीची अपकीर्ती केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा नोंद !…
कोयत्याने आक्रमण करणार्या तिघांविरोधात गुन्हा नोंद !
ठाणे – वेळेत जेवण न दिल्याने उपाहारगृहातील एका कर्मचार्यावर कोयत्याने आक्रमण करणार्या तिघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ओंकार भोसले, अभि पाटील अशी त्यातील दोघांची नावे आहेत. ओंकार भोसले हा अभिलेखावरील गुन्हेगार असून तो तडीपार होता. आरोपींचा शोध चालू आहे.
कायद्याचा धाक नसल्याचेच लक्षण !
विद्यार्थिनीची अपकीर्ती केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा नोंद !
पनवेल – इयत्ता नववीत शिकणार्या १४ वर्षीय मुलीची इंस्टाग्रामवर अपकीर्ती करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. एका विद्यार्थ्याने तिच्या पाठीला हात लावत असलेले छायाचित्र त्याखाली अश्लील शब्द लिहून पोस्ट केले. यामुळे तिने लोखंडी रॉडला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. (अश्लील कृत्य करणार्या विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई झाल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत ! – संपादक)
नागपूर येथे अमली पदार्थ तस्करीत वाढ !
नागपूर – गेल्या दीड वर्षात येथे ‘एम्डी’ या अमली पदार्थाची तस्करी वाढली असून १० मासांत गांजा आणि ‘एम्.डी.’ यांच्या तस्करीमध्ये १४१ प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. यात १९८ जणांना अटक करण्यात आली. येथे मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि मुंबई येथून अमली पदार्थांची तस्करी होते.
समाजाला व्यसनाधीन होण्यापासून रोखायला हवे !
अल्पवयीन मुलीला पळवून नेणार्यावर गुन्हा नोंद !
जळगाव – अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमीष दाखवत फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी विवेक उपाख्य बॉबी विजय सोनवणे याच्यावर अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ‘
ठाणे महानगरपालिकेकडून प्रदूषण करणार्या १३२ वाहनांवर कारवाई !
ठाणे – हवेची गुणवत्ता कायम राखण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणार्यांच्या विरोधात ठाणे महापालिकेने कारवाई केली. हवेच्या प्रदूषणास कारणीभूत असलेला राडारोडा वाहतूक करणार्या १३२ वाहनांवर पालिकेने कारवाई करून ४ लाख ८३ सहस्र रुपयांचा दंड महापालिकेने वसूल केला आहे, तर शासकीय प्रकल्पाच्या ठेकेदारांवरही दंडात्मक कारवाई केली आहे.
४ लाख ८३ सहस्र रुपयांचा दंड वसूल