पाकिस्तानी प्रशासनाने पाडले सिंध प्रांतातील श्री हिंगलाजमाता मंदिर !
कराची (पाकिस्तान) – पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील थारपारकर जिल्ह्यातील मिठी भागातील श्री हिंगलाजमाता मंदिर उद्ध्वस्त करण्यात आले. पाकचे हिंदु धर्मीय माजी क्रिकेट खेळाडू दानिश कनेरिया यांनी ट्वीट करून ही माहिती दिली. त्यांनी या घटनेचा व्हिडिओ प्रसारित करत म्हटले की, अतिक्रमणाचा आरोप करत हे मंदिर पाडण्यात आले.
Pakistani authorities continues crackdown on Hindu religious places. Following an order of anti-encroachment court Mirpurkhas, Hinglaj Mata Mandir has been demolished in Mithi, Tharparkar, Pakistan. pic.twitter.com/EUOHHcXkQt
— Danish Kaneria (@DanishKaneria61) November 23, 2023
दानिश कनेरिया यांनी पुढे म्हटले आहे की, पाकिस्तानी अधिकार्यांची हिंदूंच्या धार्मिक स्थळांवर कारवाई चालूच आहे. मीरपूरखासच्या अतिक्रमणविरोधी पथकाने न्यायालयाच्या आदेशानंतर श्री हिंगलाजमाता मंदिर उद्ध्वस्त केले. दानिश कनेरिया यांनी गेल्या वर्षीही कराचीमध्ये एका हिंदु मंदिरावर झालेल्या आक्रमणाची माहिती दिली होती.
संपादकीय भूमिकाभारतात एखाद्या अनधिकृत मशिदीविषयी असे करण्याचे धाडस प्रशासन कधीतरी दाखवू शकते का ? |