Bala Rane In Last Video : पोलिसांच्या आश्वासनानंतर कुडाळ (सिंधुदुर्ग) येथील बाळा राणे यांचे उपोषण स्थगित
‘दावत-ए-इस्लामी’ या संस्थेच्या चौकशीसह अन्य आहेत मागण्या
कुडाळ : देशहितासाठी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व जाती-धर्मांतील नागरिकांच्या सुरक्षेसाठी, ‘दावत-ए-इस्लामी’ या पाकिस्तानधार्जिण्या संस्थेच्या हालचाली थांबवण्यासाठी, मौलाना जरताब रजा खान (शहरकाजी-पीलीभीत) यांना पाठिंबा देण्यासाठी आणि झोपलेल्या पोलिसांना जागे करण्यासाठी, स्वत:च्या प्राणांची आहुती देण्यासाठी येथील बाळा राणे यांनी ‘बाळाचे अंत्यदर्शन उपोषण’ २१ नोव्हेंबर या दिवशी पानबाजार, कुडाळ येथील निवासस्थानी चालू केले होते. हे उपोषण करतांना ज्या अटी पोलीस प्रशासनासमोर ठेवल्या होत्या, त्या अटी मान्य झाल्या आहेत. त्यामुळे २३ नोव्हेंबर या दिवशी सायंकाळी उपोषण मागे घेत असल्याचे येथील बाबाजी उपाख्य बाळा सुभाष राणे यांनी सांगितले.
(सौजन्य : Bindas Bala)
कुडाळ शहरातील पानबाजारातील एका गाळ्यावर ‘दावत -ए-इस्लामी’ या संघटनेचा फलक लावण्यात आला होता. त्याचप्रमाणे या परिसरात अनोळखी व्यक्तींचा वावर वाढला आहे, याची चौकशी व्हावी, यासाठी राणे यांनी २६ जानेवारी २०२३ या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर उपोषण केले होते. ‘दावत-ए-इस्लामी’ या संघटनेचे कार्यालय येथे चालू झाल्याविषयी आवाज उठवताच गाळ्यावर लावलेला फलक त्वरित हटवण्यात आला होता. याच अनुषंगाने अनेक प्रश्नांची पोलिसांकडून योग्य, समर्पक आणि अचूक उत्तरे मिळावीत, यासाठी राणे यांनी २१ नोव्हेंबरपासून पानबाजार येथील रहात्या घरी उपोषणाला प्रारंभ केला होता.
या उपोषणाच्या अनुषंगाने राणे यांनी २० नोव्हेंबर या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे पत्र दिले होते. २२ नोव्हेंबर या दिवशी कुडाळ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला आणि त्यांचे कर्मचारी यांनी राणे यांच्या उपोषणस्थळी जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. या चर्चेचा ‘व्हिडिओ’ राणे यांनी सामाजिक माध्यमातून प्रसारित केला होता. त्यानंतर २३ नोव्हेंबर या दिवशी पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला यांनी बाबाजी उपाख्य बाळा सुभाष राणे यांना, ‘कोणत्या प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत, ते अर्जात नमूद केलेले नाही. तरी उत्तर हवे असलेले प्रश्न मुद्देनिहाय कुडाळ पोलीस ठाण्यात लेखी द्यावे. त्यावर समर्पक उत्तर देण्याची तजवीज ठेवून आहोत’, असे पत्र दिले. त्यानंतर राणे यांनी उपोषण मागे घेत असल्याचे सांगून पोलिसांकडून ज्या प्रश्नांची उत्तरे अपेक्षित आहेत, त्याचे प्रश्न लवकरच पोलिसांना लेखी स्वरुपात देणार असल्याचे सांगितले. या वेळी विवेक मुतालिक, अधिवक्ता राजीव बिले, राहुल खानोलकर, श्रीकृष्ण शिरोडकर, रमाकांत नाईक, शरद खरात आदी उपस्थित होते.
बाळाचा शेवट – बाळाचा शेवटचा व्हिडीओ भारत देश हितासाठीच (23/11/2023)
(सौजन्य : Bindas Bala)
हे ही वाचा –
♦ सिंधुदुर्ग : पानबाजार, कुडाळ येथील बाळा राणे यांचे प्रशासनाला निवेदन
https://sanatanprabhat.org/marathi/644584.html