कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा !
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – कार्तिकी एकादशीच्या निमित्त येथील श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अन् त्यांच्या पत्नी सौ. अमृता फडणवीस यांच्या हस्ते झाली. यंदा मानाचे वारकरी म्हणून नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील माळेदुमाला गावातील श्री. बबन विठोबा घुगे आणि सौ. वत्सला बबन घुगे यांना पूजा करण्याचा मान मिळाला. घुगे हे मागील १५ वर्षांपासून न चुकता वारी करत आहेत.
Extremely blessed, fortunate and grateful to Lord Shri Vitthal to bless me with the honour of performing Kartiki Ekadashi MahaPuja at Shri Vitthal Rukmini Temple in Pandharpur, with @fadnavis_amruta, early this morning.
We prayed at the feet of VitthuRukhmai to keep every person… pic.twitter.com/mu8ZhkcEOp— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 23, 2023
प्रथेप्रमाणे कार्तिकी एकादशीनिमित्त पहाटे अडीच वाजता उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. ‘राज्यातील बळीराजाला सुखी ठेव’, अशी प्रार्थना श्री विठ्ठलाच्या चरणी केली असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.