‘केवळ हिंदूंच्या सणांच्या वेळी प्रदूषण होते’, असे म्हणणे, हे षड्यंत्र नाही ना ?
‘आकार डिजी ९’ या यूट्यूब चॅनेलचे श्री. प्रभाकर सूर्यवंशी यांनी भाजपचे आमदार श्री. नितेश राणे यांची ‘हिंदु सण आणि प्रदूषण’ या विषयावर मुलाखत घेतली. या मुलाखतीचा संपादित अंश येथे देत आहोत.
१. हिंदु सणांच्या विरोधात येणार्या बातम्या अन्य सणांच्या वेळी येत का नाहीत ?
आपले हिंदु सण हिंदु राष्ट्रातील प्रत्येक हिंदूने अतिशय उत्साहाने साजरे करायला हवेत. जेव्हा जेव्हा हिंदूंचे सण येतात, तेव्हा काही ना काही निर्बंध कुठल्या ना कुठल्या तरी मार्गाने टाकण्याचा प्रयत्न होतो; पण तरीही आपल्यासारख्या सगळ्याच हिंदूंनी, कुठलाही विचार न करता, आपल्या कुटुंबाबरोबर दिवाळीसह अन्य सणही वाजत गाजत साजरे करावेत. आपण अभ्यास केला, तर लक्षात येते की, जेव्हा जेव्हा आपले हिंदु सण येतात, तेव्हा तेव्हा या आवाजाचा त्रास व्हायला लागतो. याच दिवसांमध्ये पुष्कळ धूर दिसायला लागतो आणि त्याच्यामुळे प्रदूषण होते; पण मध्ये आलेली बकरी ईद असो, मध्ये आलेल्या मोहरमच्या मिरवणुका असो, त्यात कुठल्याच प्रकारचा ना आवाजाचा त्रास होतो, ना प्रदूषणाचा त्रास होतो, ना कुठेही धूर निघतो. अशा पद्धतीने अतिशय शांत आणि सगळ्यांना एकत्र घेऊन केवळ यांचे (परधर्मियांचे) सण साजरे होतात, अशा पद्धतीने चित्र रंगवले जाते. प्रदूषणाचा जो काही सगळा त्रास होतो, हा फक्त हिंदु सणांमुळेच होतो. म्हणूनच प्रश्न पडतो की, ही चिंता खरच कुठल्या प्रदूषणाच्या निमित्ताने व्यक्त केलेली आहे ? कि हिंदु समाजाच्या विरुद्ध केलेले एक फार मोठे षड्यंत्र आहे ? याविषयी समस्त हिंदु समाजाने खरच प्रामाणिक पद्धतीने विचार करायला हवा; कारण अशा पद्धतीचा आवाज, अशा पद्धतीच्या याचिका, अशा पद्धतीच्या बातम्या, या अन्य सणांच्या वेळी का येत नाहीत ? आपला कुठलाही सण आला, तर लगेच त्याच्या पद्धतीविषयीच्या बातम्या २-३ मासांच्या अगोदर येतात. दुःख एवढेच वाटते की, याविरोधात आवाज उठवणारे, याचिका करणारे आणि हिंदु सणांना विरोध करणारे अन्य धर्माचे लोक नसतात, तर आपलेच हिंदू असतात.
२. हिंदु सणांना विरोध करणारे हिंदूंमधील सूर्याजी पिसाळच !
आपल्याकडे (हिंदूंकडे) पहातांना मुसलमान धर्माचे लोक आपल्याला ‘काफीर’ म्हणून बघतात. आपण त्यांच्याजवळ कितीही गेलो, तरी आपण काफीरच आहोत. आपण कधीही त्यांच्या जवळ, म्हणजे मांडीला मांडी लावून बसण्याएवढी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला, तरी ते हिंदूंशी कधीच तेवढी निकटता ठेवत नाहीत; पण आपल्यातच रहाणारे, आपल्याच सणांमध्ये स्वतःला हिंदु म्हणणारे, आपल्याच हिंदु समाजाच्या विरुद्ध या षड्यंत्रामध्ये सर्वांत पुढे असतात. म्हणून कधी ना कधी तरी या सगळ्यांविषयी, या जिहाद्यांविषयी विचार केलाच पाहिजे. आपण ‘आकार डिजिटल’च्या माध्यमातून सातत्याने हिंदुत्वाचे जे विषय उचलता, त्यामुळे निश्चित पद्धतीने लोकांमध्ये याची जागरूकता वाढत आहे; पण आपल्यात राहून असे बोलणारे हे सगळे सूर्याजी पिसाळ आहेत. त्यांनाच भर चौकात हिंदूंनीच पहिली शिक्षा द्यावी आणि मग जिहाद्यांकडे लक्ष द्यावे, असे मला वाटते.
३. जावेद अख्तर हिंदूंच्या ऐवजी मुसलमानांचे प्रबोधन करतील का ?
माणूस या नात्याने किती चांगले म्हणून वागावे, याला काहीतरी मर्यादा असतात. नुकतेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दिवाळीच्या कार्यक्रमाला गीतकार जावेद अख्तर आणि सलीम जावेद आले. त्या कार्यक्रमात जावेद अख्तर ‘हिंदु सण आणि हिंदु समाज किती मोठा आहे, किती सहिष्णु आहे, हिंदु समाज एवढा विशाल आहे’, असे सांगून ‘प्रभु श्रीरामाचे कौतुक करतात.’ असे आहे, तर मग हेच जावेद अख्तर त्या जिहाद्यांना याविषयी का सांगत नाहीत ? किंवा प्रत्येक मुसलमानाने जावेद अख्तरांसारखा विचार केला, तर मग आपल्या भारताला हिंदु राष्ट्र बनवण्यामध्ये अधिक वेळ लागणार नाही. जावेद अख्तरांसारखी लोक ‘घरवापसी’ का करत नाहीत ? त्यांनी हिंदु व्हावे. जावेद अख्तर यांनी पुढाकार घेऊन जेवढे काही जिहादी विचारांचे जे लोक आहेत, त्यांना परत आपल्या हिंदु समाजामध्ये आणावे. तुमच्या समाजातील (मुसलमान) काही द्वेषी लोक आमच्या हिंदूंना, हिंदु धर्माला संपवण्यासाठी दिवस-रात्र एक करत आहेत. त्यामुळे आमच्या व्यासपिठावर येऊन आमचे प्रबोधन करण्यापेक्षा महंमद अली रोडवर, त्या मालेगावमध्ये, त्या मालवणीमध्ये उभे राहून जावेद अख्तर हाच विषय सांगतील, तेव्हा खर्या अर्थाने त्यांना ‘महाराष्ट्र भूषण’ देण्याचा किंवा अयोध्येकडे घेऊन जाण्याचा विचार करू. नाही तर ही निवळ भाषणबाजी आहे, याच्या पलीकडे काहीच नाही. अन्यथा फार मोठे षड्यंत्र आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.
(साभार : ‘आकार डिजी ९’, यूट्यूब चॅनेल)