मीठपाण्‍याचे उपाय केल्‍यावर साधनावृद्धी सत्‍संगातील एका जिज्ञासूची कंबरदुखी थांबणे !

सौ. रचना राऊत

‘४.११.२०२२ या दिवशी मी धुतलेली गोधडी पिळत असतांना माझ्‍या कमरेत लचक भरली आणि कंबर ५ दिवस दुखत होती. मी कमरेला तेलाने मर्दन केले, बाम लावला आणि योगासने केली; पण मला बरे वाटेना. ८.११.२०२२ या दिवशी (ग्रहणाच्‍या दिवशी) मी नामजपाला बसले होते. तेव्‍हाही मला वेदना होत होत्‍या. त्‍यानंतर मी देवाला विचारले, ‘देवा, मला पुष्‍कळ वेदना होत आहेत, मी काय करू ?’ तेव्‍हा ‘मीठपाण्‍याचे उपाय कर’, असे देवाने मला सुचवले.

सौजन्य : spiritual science research foundation

त्‍यानंतर मी जलदेवता, स्‍थानदेवता, वास्‍तुदेवता, सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आणि श्रीकृष्‍ण यांना प्रार्थना केली आणि मीठपाण्‍याचे उपाय केले. त्‍या वेळी मला मिठाच्‍या पाण्‍यातून बुडबुडे येऊन पाणी गढूळ झाल्‍याचे दिसले. उपाय झाल्‍यावर कृतज्ञता व्‍यक्‍त करून मी उभी राहिले. त्‍या वेळी माझे कमरेचे दुखणे पूर्णपणे थांबल्‍याचे माझ्‍या लक्षात आले.

भगवंत आणि सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुमाऊली यांच्‍या कृपेने माझे दुखणे थांबले आणि मला अनुभूती घेता आली. याबद्दल मी त्‍यांच्‍या चरणी कृतज्ञ आहे.’

– सौ. रचना राऊत, रत्नागिरी (३०.१०.२०२२)      

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक