लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथील मॅकडोनाल्डच्या दुकानावर अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासनाची धाड !
हलाल संदर्भातील साहित्य जप्त !
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – येथील गोमतीनगरातील मॅकडोनाल्डसच्या दुकानावर अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासन पथकाने धाड टाकल्यावर तेथे हलाल प्रमाणपत्र असणारी उत्पादने विकली जात असल्याचे आढळून आले. राज्यात सरकारने हलालप्रमाणित उत्पादनांवर बंदी घालत त्याविरोधात कारवाई चालू केली आहे. त्या अनुषंगाने ही धाड घालण्यात आली. येथून काही साहित्य जप्त करण्यात आले आहे. याविषयी माहिती देतांना साहाय्यक आयुक्तांनी सांगितले की, मॅकडोनाल्डच्या सर्व दुकानांत पथक पाठवून चौकशी केली जात आहे. तेथे हलाल प्रमाणित उत्पादनांचा वापर होत आहे का ? हे पाहिले जात आहे. गोमतीनगर, अलीगंज, विकासनगर, महानगर, आलमबाग, ठाकुरगंज, चौक आणि रायबरेली रोड येथे ही पथके पाठवण्यात आली आहेत.
अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासन लवकरच एक दूरभाष क्रमांक प्रसारित करणार आहे. या क्रमांकावर नागरिक हलाल उत्पादनांच्या संदर्भात पथकाला माहिती देऊ शकतील. त्यानंतर संबंधितांवर कारवाई केली जाऊ शकते.