पू. रत्नमाला दळवी, सुश्री (कु.) स्मिता जाधव आणि सौ. तनुजा निनाद गाडगीळ यांच्या संदर्भात साधिकेला जाणवलेली सूत्रे
‘देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात पू. रत्नमालाताई (सनातनच्या ११८ व्या संत पू. रत्नमाला दळवी, वय ४६ वर्षे), सुश्री (कु.) स्मिता जाधव (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ४३ वर्षे) आणि सौ. तनुजा निनाद गाडगीळ (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ३५ वर्षे) एकत्र सेवा करतात. त्यांच्या समवेत सेवा करतांना मला त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे आणि त्या ज्या खोलीत सेवेला बसतात, त्या खोलीत गेल्यावर आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. जाणवलेली सूत्रे
अ. देवद आश्रमात पू. रत्नमाला दळवी, सुश्री (कु.) स्मिता जाधव आणि सौ. तनुजा गाडगीळ यांच्या समवेत सेवा करतांना मला पुष्कळ आनंद वाटतो.
आ. ‘त्या तिघींमध्ये एक अतूट असे आध्यात्मिक नाते आहे’, असे मला जाणवते.
इ. त्या एकमेकींशी मोकळेपणाने बोलतात आणि एकमेकींचे साहाय्य सहजपणे घेतात. त्यामुळे वातावरणात पुष्कळ हलकेपणा असतो.
२. या तिघी ज्या खोलीत सेवेला बसतात, त्या खोलीत गेल्यावर आलेल्या अनुभूती
अ. खोलीत गेल्यानंतर ती खोली तिच्या आकारापेक्षा मोठी वाटते.
आ. खोलीत पुष्कळ चैतन्य आणि प्रकाश जाणवतो.
इ. खोलीत प्रवेश केल्यानंतर मन एकदम उत्साही आणि आनंदी होते.’
– सौ. ज्योती नरेंद्र दाते (वय ५९ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२७.११.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |