साधनावृद्धी शिबिरामध्ये यवतमाळ येथील ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. सुनंदा हरणे (वय ५३ वर्षे) यांना आलेल्या अनुभूती
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या (गुरुदेवांच्या) कृपेने साधनावृद्धी शिबिराच्या वेळी मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. ‘मला व्यासपीठ आणि त्यावर बसलेले वक्ते कधी आकाश, कधी समुद्र, कधी घनदाट जंगल इत्यादी ठिकाणी दिसत होते.
२. ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया’ सत्संगात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे मुख लाल दिसून त्यांच्या मारक रूपाची अनुभूती येणे
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ माता यांचे तारक आणि मारक रूप मला अनुभवायला मिळाले. मारक रूपात त्यांचे मुख मला लाल दिसले. त्या वेळी ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया’ हा सत्संग चालू होता.
३. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी साधकांना भावविश्वात नेल्यावर त्यांच्या तारक रूपाची अनुभूती येणे
त्यानंतर मला श्रीसत्शक्ति मातेची प्रीती अनुभवायला मिळाली. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ माता सर्व साधकांना भावविश्वात घेऊन गेल्या.
४. गुरुमाऊलींचे चलचित्र आम्हाला दाखवले. तेव्हा सर्व साधकांची भावजागृती झाली.
५. ध्यानमंदिरात प.पू. अनंतानंद साईश यांच्या कृपेचा वर्षाव होत असल्याची अनुभूती येणे
श्रीगुरुकृपेने मला ७ – ८ दिवस ध्यानमंदिरात नामजपाला बसायची संधी मिळाली. त्या वेळी मला प.पू. भक्तराज यांचे गुरु प.पू. अनंतानंद साईश यांच्या कृपेचा वर्षाव होत असल्याची अनुभूती आली.
६. ध्यानमंदिरात भावजागृती होणे आणि मन निर्विचार झाल्याची अनुभूती येणे
ध्यानमंदिरात प्रत्येक दिवशी देवाने मला वेगवेगळ्या अनुभूती दिल्या. कधी माझी भावजागृती झाली, तर कधी माझ्या मनाची स्थिती निर्विचार झाली.
मला विविध अनुभूती देऊन आनंद प्रदान केला, यासाठी मी श्री गुरुमाऊलींच्या कोमल चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. सुनंदा हरणे, यवतमाळ (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ५३ वर्षे) (१.८.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |