आक्रमण करणार्‍यांच्या विरोधात कठोर कारवाई करा !

  • कानिफनाथ देवस्थानात भजन म्हणणार्‍यांना मारहाण केल्याचे प्रकरण

  • लांजा सकल हिंदु समाजाच्या वतीने प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी

लांजा – नुकतेच गुहा, जिल्हा-अहिल्यानगर येथे श्री कानिफनाथ देवस्थानात  भाविक आणि पुजारी भजन म्हणत असतांना अचानकपणे समाजकंटकांच्या जमावाने ‘हे मंदिर नसून दर्गा आहे’, असे सांगत पुजारी अन् भाविक यांना मारहाण करून तेथील पूजा आणि भजन बंद पाडले. ही घटना मोगलाईची आठवण करून देणारी आहे, तसेच हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असतांना कायदा हातात घेऊन ऐनदिवाळीत हिंदूंवर आक्रमण करणे अतिशय गंभीर आहे. या घटनेचा येथील सकल हिंदु समाज तीव्र निषेध करत आहे. आक्रमण करणार्‍यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी आम्ही करत आहोत, अशा आशयाचे निवेदन येथील हिंदु सकल समाजाच्या वतीने तहसीलदार प्रमोद कदम यांना देण्यात आले. या वेळी सकल हिंदु समाजाचे हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.

या निवेदनात पुढे म्हटले आहे की, या प्रकरणात एकूण ५८ हिंदूवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. हिंदूंवरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत, तसेच गावातील शांतता, सुव्यवस्था बिघडवून अशांतता निर्माण करण्यामागे कुणाचे षड्यंत्र आहे का ? या घटनेमागील ‘मास्टरमाईंड’ कोण आहे? याचीही सखोल चौकशी करावी, अशीही मागणी आहे.