मुंबईत आतंकवादी आक्रमणाची धमकी !
मुंबई – गुजरात येथील समा नावाची महिला काश्मीरमधील आसिफ नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात असून हे दोघे मुंबईत मोठे आक्रमण करणार असल्याचा दूरभाष एका व्यक्तीने मुंबई पोलिसांना केला. २१ नोव्हेंबरच्या रात्री दक्षिण मुंबईच्या पोलीस नियंत्रण कक्षात हा दूरभाष आला होता. दूरभाष करणार्या व्यक्तीने स्वत:चे नाव शोएब असे सांगितले आहे.
दूरभाषवर बोलतांना शोएब याने आतंकवादीविरोधी पथकाचे अधिकारी त्याला ओळखत असल्याचे सांगितले, तसेच त्याने समा आणि आसिफ यांचे संपर्क क्रमांकही पोलिसांना दिले आहेत. याविषयी पोलीस अन्वेषण करत आहेत. या दूरभाषनंतर पोलिसांनी सतर्कतेची सूचना दिली असून शहरात पोलीस पहारा वाढवण्यात आला आहे. यापूर्वी जुलै मासातही पोलिसांना मुंबईत घातपात करण्याच्या धमक्याही सामाजिक माध्यमातून प्रसारित करण्यात आल्या होत्या.