काश्मीरमध्ये आतंकवादी कारवायांमध्ये सहभागी असलेले ४ सरकारी कर्मचारी बडतर्फ !
पोलीस शिपाई आणि डॉक्टर यांचा समावेश !
श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – जम्मू-काश्मीर प्रशासनाने आतंकवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून ‘डॉक्टर्स असोसिएशन ऑफ कश्मीर’ (डीएके) या संघटनेचा अध्यक्ष आणि ३ अन्य सरकारी कर्मचारी यांना बडतर्फ केले आहे. यात डॉ. निसार-उल्-हसन, पोलीस शिपाई अब्दुल मजीद भट, शिक्षक फारूक अहमद मीर आणि उच्च शिक्षण विभागाच्या प्रयोगशाळेचा वाहक सलाम राथर यांचा समावेश आहे. गेल्या ३ वर्षांत प्रशासनाने राष्ट्रविरोधी आणि आतंकवादी कारवाया यांमध्ये सहभागी असल्यावरून ५९ सरकारी कर्मचार्यांना बडतर्फ केले आहे.
संपादकीय भूमिकाअशांना केवळ बडतर्फ करू नये, तर कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करावा ! |