अधर्माचरण हेच आपत्काळ येण्याचे मूळ कारण !
‘अधर्म घडणे, देव न मानणे, कुलाचारांचे पालन न करणे, देवाची उपासना न करणे इत्यादींमुळे देवतांपर्यंत आवश्यक ते उपचार, तसेच नैवेद्य पोचत नाही. यामुळे देवता पृथ्वीवर संकटे पाठवतात’, असे पुराणांत सांगितले आहे. सध्याच्या कलियुगात बहुतांशी लोकांकडून असे अपराध घडत आहेत. हेच आपत्काळ येण्याचे मूळ कारण आहे. आपत्काळात येणारी संकटे संपूर्ण समाजाला भोगावी लागतात; म्हणून अशा स्वरूपाच्या संकटांना ‘समष्टी प्रारब्ध’ असे म्हणतात !