ज्ञान, भक्ती आणि कर्म या मार्गांचा त्रिवेणी संगम म्हणजे प्रथमोपचार ! – सद़्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे
प्रथमोपचाराशी संबंधित विषयांचे अध्ययन, अध्यापन आणि सराव करणे हा ज्ञानमार्ग आहे. या अध्ययनानुसार योग्य आणि उचित कृती करणे अर्थात् ‘योग: कर्मसु कौशलम् ।’ म्हणजेच कर्ममार्ग आहे. या कृती देवाशी अनुसंधान ठेवून शरणागत भावाने करत रहाणे म्हणजे भक्तीमार्ग आहे. यामुळे प्रथमोपचार प्रशिक्षण हा उपक्रम ज्ञान, भक्ती अन् कर्म या मार्गांचा त्रिवेणी संगम आहे.