मुझफ्फरनगरमधील मदरशात अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार करणार्या मौलानाला अटक !
मुझफ्फरनगर – उत्तरप्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील एका मदरशामध्ये अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी धार्मिक शिक्षण देणार्या मौलाना इजरायल याला अटक केली आहे. पीडित तरुणाचे वय १८ वर्षे असल्याचे सांगण्यात आले. आरोपी मौलानाने त्याचा अश्लील व्हिडिओही बनवला होता. मौलानाने इतर विद्यार्थ्यांसमवेतही अश्लील कृत्य केल्याचा आारोप आहे.
पीडित विद्यार्थ्याने केलेल्या तक्रारीनुसार, अनुमाने ३ वर्षांपूर्वी त्याने मदरशात शिकण्यासाठी प्रवेश घेतला होता. मौलाना इजरायल याने मुलाला फूस लावून त्याच्या जाळ्यात अडकवले. नंतर त्याने मुलावर लैंगिक अत्याचार करणे चालू केले. मौलानाच्या या कृतीला पीडित विद्यार्थ्याने विरोध केला असता मौलानाने त्याला जिवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरून पीडित विद्यार्थी गप्प राहिला आणि मौलानाने ३ वर्षे लैंगिक अत्याचार करणे चालूच ठेवले. अखेर पीडित मुलाने मौलानाच्या विरोधात पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली. पोलिसांनी मौलाना इजरायल याच्या विरोधात ‘पॉक्सो’ कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी पोलीस अन्वेषण चालू आहे.
संपादकीय भूमिकामौलानांचे वासनाशमन केंद्रे बनलेले मदरसे ! सरकारने अशा मदरशांवर तात्काळ बंदी आणून दोषी मौलानांना आजन्म कारागृहात टाकावे ! |