‘ओम जयशंकर प्रतिष्‍ठानच्‍या वतीने श्री शंकर महाराज प्रगटदिनानिमित्त हडपसर (पुणे) येथे होम-हवन आणि रुद्राभिषेक ! 

सद्गुरु श्री शंकर महाराज

हडपसर (जिल्‍हा पुणे), २१ नोव्‍हेंबर (वार्ता) – येथील बाप्‍पा मोरया चौक, लोखंडीपूल रस्‍ता, सातववाडी येथे ‘ओम जयशंकर प्रतिष्‍ठानच्‍या वतीने श्री शंकर महाराज प्रगटदिनानिमित्त २० नोव्‍हेंबर या दिवशी कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. सकाळी ६ वाजल्‍यापासून होम-हवन आणि रुद्राभिषेक, सामुदायिक श्री शंकर गीता पारायण, प्रगटोत्‍सव, पाळणा, नैवेद्य आणि आरती आदी कार्यक्रम भक्‍तीपूर्ण वातावरणात पार पडले. ‘ओम जयशंकर प्रतिष्ठान’चे संस्थापक अध्यक्ष आणि ब्रह्म महाशिखर परिषदेचे (भारत) अध्यक्ष श्री. सुरेश दत्तात्रय पुराणिक उपाख्‍य पप्पाजी पुराणिक, तसेच सर्व पदाधिकारी आणि विश्‍वस्‍त मंडळ अन् कार्यकर्ते यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.