संस्कृत भाषेचे सौंदर्य !
दुष्ट व्यक्तीविषयी शास्त्रवचने
दुर्जन: सुजनीकर्तुं यत्नेनापि न शक्यते।
संस्कारेणापि लशुनं क: सुगन्धीकरिष्यति॥
अर्थ : प्रयत्नांची पराकाष्ठा केली, तरीसुद्धा दुर्जनाला सज्जन बनवता येणार नाही. कितीही संस्कार केले, तरी लसणीला सुवासिक कोण करील ?
यथा गजपति: श्रान्त: छायार्थी वृक्षमाश्रित:।
विश्रम्य तं द्रुमं हन्ति तथा नीच: स्वमाश्रयम्॥
अर्थ : जसे थकलेला हत्तींचा राजा सावलीसाठी वृक्षाचा आश्रय घेतो आणि विश्राम झाल्यानंतर त्याच वृक्षाचा नाश करतो, तसेच नीच (दुष्ट) मनुष्य स्वत:ला आश्रय देणार्याचा सुद्धा (कृतघ्नपणे) नाश करतो.
खलानां कण्टकानां च द्विविधैव प्रतिक्रिया।
उपानन्मुखभङ्गो वा दूरतो वा विसर्जनम्॥
अर्थ : दुष्ट मनुष्य आणि काटे यांचा दोनच प्रकारे प्रतिकार करता येतो. चपलेने फोडून काढणे अथवा दुरूनच टाळून जाणे.
क्वचित् सर्पोऽपि मित्रत्वमियात् नैव खल: क्वचित्।
न शेषशायिनोऽप्यस्य वशे दुर्योधन: हरे:॥
अर्थ : क्वचित् सर्पसुद्धा आपला मित्र बनू शकतो; परंतु दुष्ट कधीच मित्र बनू शकत नाही. शेषनागावर शयन करणार्या हरिचा सुद्धा (शेषनाग मित्र होऊनही) दुर्योधन मित्र बनू शकला नाही.