पुण्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा !
पुणे – शहरातील २७ पैकी बहुतांश रक्तपेढ्यांमधील रक्तसाठ्याची स्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे रुग्णाच्या रक्तगटाला पूरक रक्त मिळवण्यासाठी नातेवाइकांना प्रयत्न करावे लागत आहेत. रक्ताची मागणी वाढली आहे; मात्र रक्त संकलन न्यून झाले आहे. सुट्यांमुळे रक्तदान शिबिरांची संख्या न्यून झाली होती. दिवाळीच्या सुटीमुळे नियोजित शस्त्रक्रियांचे प्रमाण वाढले आहे. पुणेकरांनी रक्तदान करावे, असे आवाहन जनकल्याण रक्तपेढीचे संचालक डॉ. अतुल कुलकर्णी यांनी केले आहे.