‘मी हिंदूंसाठी बोलणार नाही, तर काय बाबर आणि औरंगजेब यांच्यासाठी बोलणार का ?’ – हिमंत बिस्व सरमा, मुख्यमंत्री, आसाम
हिंदुहिताचे वक्तव्य केल्यावरून आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांच्यावर टीका करणार्या काँग्रेसच्या नेत्या प्रियांका वाड्रा यांना सरमा यांचे प्रत्युत्तर !
जयपूर (राजस्थान) – जर मी भारतात हिदूंविषयी बोलणार नाही, तर बाबर आणि औरंगजेब यांच्याविषयी बोलणार का? भारतात हिंदुहिताचा अर्थ काय आहे ? हिंदु म्हणतात ‘संपूर्ण विश्व माझे कुटुंब आहे.’ जर तुम्ही अशा संस्कृतीचे गुणगान करणार नाही, तर कुणाचे गाणार ? जोपर्यंत माझा श्वास चालू आहे, तोपर्यंत मी हिंदूंचे गुणगान गात रहाणार, अशा शब्दांत आसामचे भाजप सरकारचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी येथे पत्रकारांशी बोलतांना प्रियांका वाड्रा यांना प्रत्युत्तर दिले. प्रियांका वाड्रा यांनी येथे विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी मुख्यमंत्री सरमा यांच्यावर टीका करतांना म्हटले होते की, भाजप धर्माच्या नावावर मते मागतो. सरमा हिंदूंच्या हिताच्या गोष्ट करतात.
संपादकीय भूमिकाकाँग्रेसने म. गांधी यांच्या उदयापासून मुसलमानांच्याच हिताचे काम करत हिंदूंशी द्रोह केला असल्याने कुणी हिंदूंच्या हिताविषयी बोलले, तर काँग्रेसवाल्यांना आणि गांधी परिवाराला मिरच्या झोंबणारच ! |