आगीच्या संदर्भात सूचना
आगीच्या संभाव्य धोक्याविषयी जागरूक आणि सावधान रहाणे, हा अग्नीशमनाचे ज्ञान आत्मसात करण्याचा उद्देश आहे. पुढील लहान-सहान गोष्टी आचरणात आणल्यास कित्येक अपघात टाळले जाऊ शकतात.
१. घर आणि कार्यालय स्वच्छ राखा.
२. रद्दी, कागद इत्यादी व्यवस्थित बांधून ठेवा. कपडे घडी करून कपाटात ठेवा.
३. विजेच्या बटणांच्या जवळ ज्वलनशील पदार्थ ठेवू नका.
४. फटाके किंवा अन्य स्फोटक वस्तूंचा साठा घरात करू नका.
५. मेणबत्ती कधीही लाकडी साहित्यावर लावू नका.
६. झोपतांना डास विरोधक उदबत्ती लावतांना ती अंथरुणापासून दूर आणि सुरक्षित ठिकाणी लावा.
७. घरातून बाहेर जातांना तेलाचा दिवा जळत असल्यास तो शांत करा.
८. घराबाहेर कचरा जाळतांना आग पसरणार नाही, याची काळजी घ्या.
९. दुर्गंधीनाशक स्प्रे किंवा त्याप्रकारचे अन्य रिकामे डबे चुकूनसुद्धा आगीत टाकू नका.
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘अग्नीशमन प्रशिक्षण’)