भ्याड आक्रमणामागील गुन्हेगारांना शोधून कठोर कारवाई करण्याची निवेदनाद्वारे मागणी
अहिल्यानगर येथे हिंदु पुजारी आणि अन्य हिंदू यांवर झालेले आक्रमण आज अहिल्यानगर येथे मोर्चा !
अहिल्यानगर – जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील गौह या गावातील श्री कानिफनाथ देवस्थान हे या गावाचे ग्रामदैवत असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून सर्व नाथभक्त आणि पंचक्रोशीतील भाविक प्रत्येक गुरुवारी अन् अमावास्येला या ठिकाणी पूजा, आरती आणि धार्मिक कार्यक्रम करतात. याच मंदिराच्या बाजूला अवैधरित्या दर्गा निर्माण करून मंदिराची ३९ एकर जागा ‘वक्फ बोर्डाच्या घशात घालण्याचा कुटील डाव चालू आहे. दिवाळीच्या निमित्ताने या मंदिरात कार्यक्रम चालू असतांना अचानक स्थानिक धर्मांधांच्या जमावाने ‘हे मंदिर नसून दर्गा आहे’, असे म्हणत मंदिरातील पुजारी आणि भाविक यांना मारहाण केली. तसेच तेथील धार्मिक कार्यक्रम बंद पाडला. या घटनेचा निषेध म्हणून ठिकठिकाणी निदर्शने केली, निवेदने देण्यात आली, तरी अद्यापही या धर्मांधांवर कुठलीही कारवाई झालेली नाही. यामागील मुख्य सूत्रधार शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी नगर येथील निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना निवेदन देण्यात आले. या वेळी वारकरी संप्रदायाचे ह.भ.प. रामदास महाराज क्षीरसागर, ह.भ.प. लक्ष्मीकांत नल्ला महाराज, ह.भ.प. प्रकाश महाराज शेराल, हिंदु जनजागृती समितीचे श्री. रामेश्वर भुकन, हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री उत्तमराव वाबळे, रमेश बेरड, योगेश तागड, कार्तिक पोहोनेरकर आदी उपस्थित होते .
या घटनेचा निषेध म्हणून समस्त वारकरी संप्रदाय महाराष्ट्र राज्य, समस्त गुहा ग्रामस्थ, तसेच पंचक्रोशीतील हिंदु बांधव यांच्याकडून भव्य वारकरी मोर्चाचे आयोजन केले असून हा मोर्चा २१ नोव्हेंबर या दिवशी सकाळी १० वाजता वाय.सी.एम्. ग्राउंड, राहुरी येथून चालू होऊन नवीपेठ मार्गे तहसील कार्यालय, राहुरी या ठिकाणी समारोप होईल.
संपादकीय भूमिकाहिंदूंनो, मंदिरांना दर्गा संबोधणार्या उद्दाम धर्मांधांच्या कह्यात आपली मंदिरे जाऊ नयेत, यासाठी आतातरी संघटित व्हा ! |