ध्यास लागो गुरुचरणांचा ।
ध्येय आहे
गुरुचरणांपाशी जाण्याचे ।
ध्येय आहे
गुरूंशी एकरूप होण्याचे ॥
ध्येय आहे
समष्टी साधना करण्याचे ।
ध्येय आहे स्वतःचा
उद्धार करून घेण्याचे ॥ १ ॥
ध्येय गाठतांना स्वभावदोष आणि अहं नष्ट व्हावेत ।
गुरुदेवांची कृपा व्हावी ।
तळमळ वाढवून ।
जिद्दीने प्रयत्न व्हावेत ॥ २ ॥
ध्यास लागो सतत गुरुचरणांचा ।
गुरूंसाठी झिजावे,
गुरूंसाठीच जगावे ॥
गुरुतत्त्वाशी एकरूप व्हावे ।
हीच प्रार्थना आहे गुरुदेवांकडे ॥ ३ ॥
– कु. आरती नारायण सुतार, म्हापसा, गोवा. (२६.७.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |