प्रयोगशाळांतील चाचणींचा अहवाल सादर करा !
हलाल प्रमाणपत्र देणार्या इस्लामी संस्थांना पोलिसांची नोटीस !
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – लक्ष्मणपुरी पोलिसांनी हलाल प्रमाणपत्र देणार्या ४ इस्लामी संस्थांच्या विरोधात गुन्हा नोंदवल्यानंतर आता त्यांना नोटीस बजावली आहे. पोलिसांनी या संस्थांना त्यांचे प्रयोगशाळेतील चाचण्यांचे अहवाल आणि या संदर्भातील अन्य कागदपत्रे सादर करण्याचा आदेश दिला. पोलिसांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी २ पथके स्थापन केली आहेत. सायबर सेल विभागही सक्रीय करण्यात आला आहे. भाजप युवा मोर्चाचे माजी क्षेत्रीय उपाध्यक्ष शैलेंद्र शर्मा यांनी हलाल प्रमाणपत्राच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून कारवाई चालू केली आहे.
दुकानदारांकडे जाऊन हलाल प्रमाणित वस्तूंची तपासणी चालू !
पोलिसांनी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये ‘हलाल प्रमाणित’ असे लिहिलेल्या टूथपेस्ट, टूथब्रश, साबण, तेल, केक, बिस्किट, चहापावडर, साखर आदी वस्तूंच्या तपासणीस प्रारंभ केला आहे. या उत्पादनांची ऑनलाईन विक्री करणार्या संकेतस्थळांसह अशा वस्तू खरेदी करणार्यांवर सायबल सेलकडून लक्ष ठेवण्यात येत आहे. सायबर सेलला खरेदी-विक्री करणार्यांकडून माहिती गोळा करण्याचा आदेश देण्यात आला आहे. पोलीस सहआयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) उपेंद्र कुमार अग्रवाल यांनी सांगितले की, या संस्थांच्या अर्थपुरवठ्याचीही चौकशी करण्यात येत आहे. तपासणीत माहिती मिळाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.
कानपूर येथील ‘मॉल’वर धाड : हलाल प्रमाणित वस्तूंची तपासणी(मॉल म्हणजे अनेक दुकाने आणि उपाहारगृहे असणारी इमारत) कानपूर (उत्तरप्रदेश) : अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासनाने येथील सर्वांत मोठ्या ‘मॉल’मधील काही उपाहारगृहांवर धाड घालून हलाल प्रमाणित वस्तूंची तपासणी केली. प्रशासनाच्या ५ पथकांनी ही धाड घातली. सायंकाळी उशिरापर्यंत येथे हलाल प्रमाणित वस्तूंची तपासणी चालू होती. |
अत्तर आणि धान्य उत्पादनांची सर्वाधिक होत आहे ऑनलाईन विक्री !
लक्ष्मणपुरीच्या हजरतगंज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विक्रम सिंह यांनी सांगितले की, प्राथमिक चौकशीत माहिती मिळाली की, अत्तर आणि धान्य उत्पादनांची सर्वाधिक विक्री ऑनलाईन होत आहे. यासाठी सायबर सेलही चौकशी करत आहे. या वस्तूंची विक्री करणारे वितरक आणि दुकानदार यांच्याकडून माहिती गोळा केली जात आहे. यानंतर कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी अन्न सुरक्षा आणि प्रशासन विभागाच्या पथकाकडूनही दुकानांची चौकशी करण्यात येणार आहे.
संपादकीय भूमिकाहलाल प्रमाणपत्र देणार्या इस्लामी संस्था पदार्थांची कोणतीही चाचणी न करता प्रमाणपत्र देत आहेत, हेच यातून स्पष्ट होणार आहे ! |