उसगाव येथील गोवा मांस प्रकल्पाच्या परिसरात दुर्गंधी : स्थानिक हैराण
उसगाव, १९ नोव्हेंबर (वार्ता.) : उसगाव येथील गोवा मांस प्रकल्पाच्या परिसरात दुर्गंधी पसरली आहे आणि यामुळे स्थानिक हैराण झाले आहेत. या दुर्गंधीमुळे आसपासच्या परिसरातील नागरिकांना जेवणही नकोसे वाटत आहे आणि दुर्गंधीमुळे उलट्या होऊ लागल्या आहेत. या दुर्गंधीमुळे नागरिकांकडे नातेवाइकांचे येणे बंद झाले आहे. सरकारने तातडीने याकडे लक्ष देण्याची मागणी उसगाव पंचायतीच्या पंचसदस्या सौ. मनीषा उसगावकर आणि सौ. वैभवी गावडे यांनी एका चलचित्राद्वारे केली आहे.
(सौजन्य : prime media goa)
पंचसदस्यांनी केलेल्या आरोपानुसार गोवा मांस प्रकल्पाचा ‘रंडरींग प्लांट’ चालत नसावा, तरीही हा प्रकल्प चालू आहे. प्रकल्पाच्या परिसरातील दुर्गंधीविषयी उसगाव पंचायत अणि गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडे तक्रार प्रविष्ट केल्यास तपासणीच्या वेळी प्रकल्पाात काही वेळापुरती स्वच्छता राखली जाते आणि कालांतराने दुर्गंधी कायम असते. या ठिकाणी परराज्यांतून कुसलेले मांस आणले जात असावे. सरकारने नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देऊन तातडीने यावर कारवाई करावी.’’