पुणे येथील ‘रुबी हॉल क्लिनिक’मध्ये लैंगिक छळ प्रकरणी दोघांवर गुन्हा नोंद !
पुणे – शहरातील नामवंत ‘रुबी हॉल क्लिनिक’मध्ये काम करणार्या महिलेचा लैंगिक छळ केल्याची घटना घडली आहे. मानव संसाधन विभागाचे प्रमुख प्रभाकर श्रीवास्तव आणि टेक्निशीयन (तांत्रिक कर्मचारी) बाळकृष्ण शिंदे यांच्यावर कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ‘शारीरिक सुखाची मागणी केली आणि ती पुरवली नाही, तर कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली’, असे ४५ वर्षीय महिलेने तक्रारीमध्ये नमूद केले आहे. हा प्रकार २१ एप्रिल २०२३ आणि शेवटच्या सप्ताहामध्ये घडला आहे.
गेल्या सप्ताहामध्ये ‘रुबी हॉल क्लिनिक’च्या देयक विभागातील (बिलिंग डिपार्टमेंट) मिताली आचार्य या कर्मचारी महिलेने आत्महत्या केली होती. ‘रुबी’च्या प्रशासनाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप शिवसेनेने केला होता.
संपादकीय भूमिकाकेवळ गुन्हा नोंद करून न थांबता त्यांना लवकरात लवकर कठोर शिक्षा होणे आवश्यक ! |