ए.पी.एम्.सी.तील शौचालय वितरणातील घोटाळ्याच्या प्रकरणी दोघांना अटक
नवी मुंबई, १९ नोव्हेंबर (वार्ता.) – मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील शौचालय वितरण घोटाळ्याच्या प्रकरणी सुरेश मारू आणि मनीष पाटील या दोघांना अटक करण्यात आली आहे. शौचालय वितरण कंत्राटामध्ये शासनाची ७ कोटी ६१ लाख ४९ सहस्र रुपयांची हानी झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) माजी आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह ८ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना २२ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
संपादकीय भूमिकाशौचालय वितरणातही घोटाळा होणे लज्जास्पद ! |