महाराष्ट्रातील १२ आमदार प्रशासकीय व्यवस्थेच्या अभ्यासासाठी ब्रिटनच्या दौर्यावर जाणार !
मुंबई – ब्रिटनमधील प्रशासकीय व्यवस्था अर्थात् युनायटेड किंगडमचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील १२ आमदार २० नोव्हेंबर या दिवशी ब्रिटनच्या दौर्यावर जाणार आहेत. यामध्ये भाजप, शिवसेना, काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि समाजवादी पक्ष यांच्या आमदारांचा समावेश आहे.
हा दौरा ५ दिवसांचा असून यामध्ये ‘वेल्स ट्रिनिटी सेंट डेव्हिड’ विद्यापिठाला आमदार भेट देणार आहेत. विद्यापिठातील विविध सांस्कृतिक कार्यक्रमात हे आमदार सहभागी होणार आहेत.
यामध्ये भाजपचे अमित साटम, मिहिर कोटेचा, जयकुमार रावल, मंगेश चव्हाण, पंकज भोयर, उद्धव ठाकरे गटाचे आमदार आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेसचे अमीन पटेल, झिशान सिद्दिकी, अमित झनक, अस्लम शेख, समाजवादी पक्षाचे रईस शेख आणि अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांचा समावेश आहे.