पिंपरी (पुणे) येथे प्रा. मोरे प्रेक्षागृहातील भाड्याच्या रकमेत अपहार !
लिपिक निलंबित
पिंपरी (पुणे) – महापालिकेचे प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाचे भाडे, अनामत रक्कम आणि इतर शुल्कासाठी जमा झालेल्या रकमेत ७ लाख ६६ सहस्र २३६ रुपयांचा अपहार करण्यात आला आहे. या प्रेक्षागृहाचे व्यवस्थापन करणारे लिपिक संकेत जंगम यांचे निलंबन करण्यात आले असून विभागीय अन्वेषण चालू करण्यात आले आहे, अशी माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली आहे. (एवढ्या मोठ्या रकमेचा अपहार होईपर्यंत कुणाला लक्षात आले नाही का ? – संपादक)
प्रा. मोरे प्रेक्षागृहामध्ये व्यावसायिक नाटक, स्नेहसंमेलन, मेळावे, सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम सतत होतात. त्यापोटी मिळणारे भाडे आणि अनामत रक्कम जमा करून तशी नोंद नोंदवहीमध्ये केली आहे; मात्र प्रत्यक्षामध्ये त्यातील काही रक्कम अधिकोषामध्ये (बँकेत) भरली नसल्याचे दिसून येत आहे.