श्रीरामपूर (अहिल्यानगर) येथे कत्तलीसाठी आणलेल्या १४ गोवंशियांना ‘शिवप्रहार’च्या कार्यकर्त्यांमुळे जीवनदान
श्रीरामपूर (जिल्हा अहिल्यानगर) – येथील इराणी गल्लीतील श्रीरामपूर न्यायालयाच्या समोरील एका पटांगणामध्ये १४ लहान गोवंशियांना कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवण्यात आले होते. याची बातमी १९ नोव्हेंबर या दिवशी ‘शिवप्रहार’ संघटनेचे कार्याध्यक्ष चंद्रशेखर (चंदू) आगे यांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन या गोवंशियांची सुटका केली. ‘शिवप्रहार’चे मावळे आणि श्रीरामपूर शहर पोलीस यांंच्या साहाय्याने या गोवंशियांना कह्यात घेऊन श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. (राज्यात गोवंशहत्या बंदी कायदा लागू असूनही कायद्याची कडक कार्यवाही होत नसल्यानेच सर्वत्र गोहत्या होऊन गोमांसाची अवैध वाहतूक चालू आहे ! – संपादक)