सुपा (अहिल्यानगर) येथे गोरक्षकांनी वाचवले ३१ गोवंशियांचे प्राण !
वाहनचालकावर गुन्हा नोंद !
अहिल्यानगर – बेल्हे येथून नगर झेंडीगेट या ठिकाणी १८ नोव्हेंबर या दिवशी गायी आणि वासरे कत्तलीसाठी घेऊन जाणार आहेत, अशी माहिती मानद पशूकल्याण अधिकारी ऋषिकेश भागवत यांना मिळाली. त्यानंतर लगेच त्यांनी सुपा पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी ज्योती गडकरी यांना संपर्क करून कारवाई करण्याची विनंती केली. या कारवाईत वाहनचालक रमजान चौघुले आणि किरण चव्हाण यांनी गाडीतील २ गायी आणि २९ वासरे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे मान्य केले. त्यानुसार वाहनचालकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या कारवाईसाठी गोरक्षक सर्वश्री अभिजित चव्हाण, गौरव शिंदे, ऋषि चावरे, सनी थोरात, महेश बालघरे, चैतन्य सुडे, देवा मोटे, सनी साळवे, अवी मोटे यांनी परिश्रम घेतले.
संपादकीय भूमिकागोवंशहत्या बंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही केल्यास राज्यातील गोवंश वाचवता येईल ! |