कोकण रेल्वेकडून २२ डिसेंबर ते २ जानेवारीदरम्यान विशेष गाड्या  


रत्नागिरी – नाताळच्या पार्श्वभूमीवर गोव्यात पर्यटकाची मोठी गर्दी होत असते. त्यामुळे गोव्याला जाणार्‍या प्रवाशांना २२ डिसेंबर ते २  जानेवारी दरम्यान विशेष रेल्वे गाड्या सोडणार आहे. नाताळ स्पेशल या गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते करमळी, पुणे जंक्शन ते करमळी आणि आणि पनवेल ते करमळी या स्थानकादरम्यान धावणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सी.एस्.एम्.टी.) ते करमळी (०२०५१ ) ही विशेष गाडी २२ डिसेंबर या दिवशी मध्यरात्री १२ वाजून २० मिनिटांनी सी.एस्.एम्.टी. स्थानकातून सुटेल. त्याच दिवशी दुपारी २ वाजता गोव्यातील थिविमला पोचेल. तर  थिविम – सी.एस्.एम्.टी (०११५२) ही विशेष दैनिक गाडी थिविम येथून २२ डिसेंबर ते २ जानेवारी दरम्यान प्रतिदिन दुपारी ३ वाजता सुटेल.
पुणे जं. – करमळी (०१४४५) विशेष (साप्ताहिक) पुणे जंक्शन येथून २२ आणि २९ जानेवारीला सायंकाळी ५.३० वाजता सुटेल. ही गाडी  दुसर्‍या दिवशी सकाळी ८.३० वाजता करमळीला पोचेल. करमाळी – पुणे जंक्शन (०१४४६) विशेष (साप्ताहिक) २४ आणि ३१ डिसेंबर या दिवशी करमळी येथून सकाळी ९.२० वाजता सुटेल. ही गाडी रात्री ११.३५ वाजता पुणे जंक्शनला पोचेल. ही गाडी लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम स्थानकांवर थांबेल.

गोव्याला विशेष रेल्वे गाड्या सोडणार

पनवेल – करमळी विशेष गाडी २३ आणि ३० डिसेंबर या दिवशी पनवेल येथून रात्री १० वाजता सुटेल. दुसर्‍या दिवशी सकाळी ८.३० वा. ही गाडी करमळीला पोचणार असून, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, रोहा स्थानकावर थांबणार आहे.