Hospitals in Pakistan : आर्थिक कंबरडे मोडलेल्या पाकमधील ६ रुग्णालये बंद होण्याच्या स्थितीत !
|
इस्लामाबाद (पाकिस्तान) – आर्थिक कंबरडे मोडलेल्या पाकिस्तानमधील रुग्णालयांचीही दुर्दशा पहावयास मिळत आहे. देशातील ५ सरकारी रुग्णालये, तसेच लाहोरमधील शेख जायद रुग्णालय ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत. रुग्णालयांचे सुव्यवस्थित संचालनासाठी तब्बल ११ अब्ज पाकिस्तानी रुपयांची आवश्यकता असतांना वित्त विभागाची ही मागणी संघीय आरोग्य मंत्रालयाने फेटाळली आहे. यामुळे अनेक कर्मचार्यांचे वेतन थांबवण्यात आले आहे.
अशी झाली आहे रुग्णालयांची दुर्दशा !
- वेतन न दिल्यावरून ‘पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’च्या परिचारिकांकडून एका आठवड्यापासून विरोध प्रदर्शन !
- ‘टेस्टिंग किट’ संपत आल्याने रुग्णालयांच्या प्रयोगशाळाही लवकरच बंद पडणार !
- ‘फिल्म’ नसल्याने ‘रेडिओलॉजी’ परीक्षणही लवकरच थांबणार !
- रुग्णालयांना औषध आस्थापनांना निविदेच्या राशीची परतफेडही न करता आल्याने रुग्णांना औषधेही मिळेनाशी झाली आहेत !
- निकटच्या भविष्यात रुग्णालयांतील आपत्कालीन विभागही बंद होण्याची शक्यता !
वर्षभरात गगनाला भिडली पाकिस्तानातील महागाई !‘डॉन’ या पाकिस्तानी वृत्तपत्राने ‘पाकिस्तान सांख्यिकी विभागा’ने दिलेल्या आकड्यांचा हवाला देत सांगितले की, गेल्या वर्षभरात गॅसच्या शुल्कात तब्बल १ सहस्र १०० टक्क्यांची वृद्धी झाली आहे. यासह सिगारेट ९४.५ टक्के, गव्हाचे पीठ ८६.४ टक्के, मिरची पावडर ८१.७ टक्के, अर्धा बासमती तांदूळ ७६.७ टक्के, तर लसूण गेल्या वर्षभरात ६३.६ टक्क्यांनी महाग झाला आहे. |
संपादकीय भूमिकाभारतातील पाकप्रेमींना भारताचे महत्त्व आतातरी कळेल, अशी अपेक्षा ! |