मुंबईतील भाभा अणुसंशोधन केंद्राच्या क्वॉर्टरमध्ये तरुणीवर बलात्कार
२ आरोपींना अटक
मुंबई – येथील भाभा अणुसंशोधन केंद्राच्या क्वॉर्टरमधील घरात १९ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अजित कुमार यादव (वय २६ वर्षे) आणि प्रभाकर यादव (वय ३० वर्षे) यांना अटक करून गुन्हा नोंदवला आहे. मुंबई पोलिसांनी दोन्ही आरोपींना न्यायालयात उपस्थित केल्यावर त्यांना २० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी शीतपेयाचे नमुने गोळा करून पडताळणीसाठी पाठवले आहेत.
१. पीडित तरुणी वाणिज्य शाखेत शिकते. ती आई आणि बहीण यांच्या समवेत पालघर येथे रहाते; पण वडील भाभा अणुसंशोधन केंद्र येथे नोकरी करत असल्याने त्यांना भेटण्यासाठी ती मुंबईत आली होती.
२. अजित कुमार यादव हा पीडितेला ओळखत होता. तो केंद्रात काम करणार्या कर्मचार्याचाच मुलगा आहे. त्याचे आई-वडील बाहेरगावी गेल्यावर त्याने मित्राला घरी बोलावले होते. पीडिता स्वयंपाकाचे साहित्य घेण्यासाठी अजितच्या घरी गेली होती. या वेळी त्या दोघांनी तिला काहीतरी मिसळलेले शीतपेय दिले. ते प्यायल्यावर ती बेशुद्ध झाली. त्याचा अपलाभ घेत त्या दोघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. काही वेळाने शुद्धीवर आल्यावर तिला झालेला प्रकार समजला. (तरुणींनो, परिचितांच्या संदर्भातही सावधानता बाळगा ! – संपादक)
संपादकीय भूमिकाअशा बलात्कार्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत. अशी शिक्षा झाल्यावर वासनांध वृत्तीच्या लोकांवर वचक बसेल ! |