Fast Unto Death For Hindu Rashtra : भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्यासाठी आमरण उपोषण करून झाले १० दिवस !
जगद्गुरु परमहंस आचार्य यांच्याकडे सरकारचे दुर्लक्ष !
अयोध्या (उत्तरप्रदेश) – येथील संत जगद्गुरु परमहंस आचार्य भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्याची मागणी करत आमरण उपोषणावर बसले आहेत. त्यांनी हे उपोषण चालू करून १० दिवस झाले, तरी उत्तरप्रदेश आणि केंद्र सरकार यांनी त्यांच्याकडे लक्ष दिलेले नाही. आचार्यांच्या समर्थनार्थ चित्रपट अभिनेते मुकेश खन्ना यांनी सामाजिक माध्यमातूंन प्रसारित केलेल्या व्हिडिओमुळे ही घटना समोर आली.
गेल्या वर्षीच आचार्य यांनी भारताला घटनात्मक स्तरावर ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्याची मागणी केली होती. ‘जर ७ नोव्हेंबर २०२३ या दिवसापर्यंत केंद्र सरकारने हे पाऊल उचलले नाही, तर आमरण उपोषण करून जलसमाधी घेईन’, असेही ते त्या वेळी म्हणाले होते. सरकारने त्यांची मागणी पूर्ण न केल्याने त्यांनी त्यांच्या निवासस्थानी आमरण उपोषणास आरंभ केला आहे.
माझ्या चौकशीसाठी प्रशासकीय अधिकारी आलेला नाही ! – परमहंस आचार्य
जगद्गुरु परमहंस आचार्य म्हणाले की, गेल्या ९ दिवसांत माझे वजन साधारण ७ किलो अल्प झाले आहे. पाणी न पिता मी उपोषण करत असूनही माझी चौकशी करण्यासाठी कुणी प्रशासकीय अधिकारी अथवा लोकप्रतिनिधी आलेला नाही.
संपादकीय भूमिका
|