Chandigarh Airport Khalistan Zindabad : चंडीगड विमानतळाबाहेर ‘खलिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा
मोहाली (पंजाब) – चंडीगड विमानतळाबाहेर ‘खलिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्याची घटना घडली. या घोषणांचे दायित्व खलिस्तानी आतंकवादी संघटना ‘सिख फॉर जस्टिस’चा प्रमुख गुरपतवंत सिंह पन्नू याने घेतली आहे. पन्नूने त्याचा व्हिडिओही प्रसारित केला आहे. त्याने एअर इंडियाच्या विमानांवर बहिष्कार टाकण्याची घोषणाही केली आहे. त्याने व्हिडिओत म्हटले आहे की, आमच्या संघटनेला अमृतसर, कर्णावती आणि देहली विमानतळांवर प्रवेश आहे. खलिस्तानी राष्ट्राच्या हिताचे रक्षण करण्यासाठी १९ नोव्हेंबरनंतर एअर इंडियाच्या विमानांतून उड्डाण करू नका; कारण त्यामुळे भावी शीख पिढ्या धोक्यात येतील.
पन्नू याने काही दिवसांपूर्वीच १९ नोव्हेंबरला एअर इंडियाच्या विमानाने प्रवास न करण्याचे आवाहन केले होते. तसेच या दिवशी देहलीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद करण्याची धमकी दिली होती.
संपादकीय भूमिकाखलिस्तान्यांची कीड चिरडण्यासाठी राष्ट्रप्रेमी शिखांनी पुढे येणे आवश्यक ! |