कॅनडा हे आतंकवादी घटकांचे नंदनवन !

कॅनडा : आतंकवादी घटकांचे नंदनवन !

‘कॅनडा हे अनेक संस्कृतीची ओळख देणारे आहे; कारण तेथील लोकसंख्येमधील एक पंचमांश नागरिक हे विदेशात जन्मलेले आहेत. ‘स्थलांतरित होणार्‍या लोकांचे स्वागत करणे आणि त्यांचा समाजात अंतर्भाव करणे’, असे करण्यात कॅनडाला अभिमान आहे; परंतु यामुळे आतंकवादी गटांना त्यांची दुकाने चालवणे सोपे झाले अन् कॅनडातील समाजाला धोका निर्माण झाला. दुर्दैवाने कॅनडातील अनेक राजकारणी या आतंकवादी गटांना मते मिळवण्याचा स्रोत समजत असल्याने या गटांना त्यांच्या दुष्ट कारवाया करण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. त्यामुळे कालांतराने कॅनडा हे ‘जगातील आतंकवादी घटकांचे नंदनवन’ म्हणून ओळखले जात आहे. यामध्ये पाकिस्तान आणि भारत येथून पळून आलेल्या खलिस्तानी गुन्हेगारांचा समावेश आहे. ‘ग्लोबल न्यूज’मधील लेखानुसार कॅनडा एक गुप्त उपक्रम राबवत आहे, ज्यामध्ये युद्धातील गुन्हेगार, आतंकवादी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक लोकांना ‘व्हिसा’ दिला जात आहे. वर्ष २०१५ मध्ये खलिद साबर अब्देल अहमद झा याला कॅनडाने कायमचा रहिवासी दाखला दिला. खलिद झा हा इजिप्तमधील बंडखोर गटाचा प्रमुख सदस्य असून त्याचा वर्ष २०१३ मध्ये अध्यक्ष महंमद मोरसी यांची सत्ता पालटण्यात सहभाग होता. ६ मासांपूर्वी तो कॅनडामध्ये आला. खलिद झा याच्यासाठी कॅनडाच्या सुरक्षा अधिकार्‍यांनी स्वतःचे धोरण शिथिल केले.

(साभार : ‘हिंदुद्वेष डॉट ओआरजी’चे संकेतस्थळ)