केरळमधील हिंदूंचे जीवन भीतीच्या सावटाखाली !

केरळ काश्मीरच्या वाटेवर !

कोण्णियूर पी.पी.एम्. नायर

सध्या इस्रायल आणि ‘हमास’ आतंकवादी संघटना यांच्यात युद्ध चालू आहे, तसेच भारतासह सीरिया अन् अन्य देशांमध्ये आतंकवादाचा उच्छाद चालू आहे. भारतातील ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनेवर केंद्र सरकारने बंदी घातल्यानंतरही केरळमध्ये तिचे जिहादी सापडत आहेत. केरळमधील परिस्थिती अशी आहे की, तेथे साम्यवादी पक्षाचे सरकार आहे आणि ते जिहाद्यांना मिळालेले आहे, तसेच साम्यवादी पक्षाच्या सरकारमधील सर्व नेते जिहादी आतंकवाद्यांना सामील झाले आहेत. इस्रायल आणि हमास यांच्या युद्धात हमास अन् पॅलेस्टाईन यांचे समर्थन करण्यासाठी केरळच्या मुसलमानबहुल मल्लपूरम् जिल्ह्यात ‘जमात-ए- इस्लामी’ या संघटनेच्या ‘सॉलिडेरिटी यूथ मूव्हमेंट’ या युवा शाखेने २७ ऑक्टोबर या दिवशी एक ‘ऑनलाईन’ सभा आयोजित केली होती. या सभेला हमासचा नेता खालिद मेशाल याने संबोधित केले. या सभेत खालिद याने हिंदुविरोधी घोषणाबाजी केल्याचेही दिसून आले. या रॅलीत जिहाद्यांनी ‘हिंदुत्व नष्ट करायचे आहे’, असे उघडपणे म्हटले. त्यांनी हिंदुत्व नष्ट करण्याचे षड्यंत्र रचले असून केरळमधील हिंदूंची स्थिती अत्यंत कठीण आहे.

१. केरळमधील मंदिरांचे सरकारीकरण आणि हिंदूंच्या श्रद्धांचे भंजन

केरळमध्ये अनेक प्राचीन आणि पुरातन मंदिरे आहेत. केरळमधील साम्यवादी सरकारने येथील सर्व मंदिरांचे सरकारीकरण केलेले आहे. त्या माध्यमातून साम्यवादी सरकारने मंदिरांतील प्राचीन सोने हडपले आहे. ‘मंदिरांच्या पवित्र तळीमध्ये दैवी मासे असतात’, अशी हिंदूंची मान्यता आहे. त्या माशांना भाविक खाद्य देतात. त्या तळी सरकारने कह्यात घेऊन तेथे मत्स्यपालन व्यवसाय चालू केला आहे.

२. कपाळावर टिळा लावण्यास आणि सण साजरे करण्यास हिंदूंना आहे अप्रत्यक्ष बंदी !

केरळमध्ये टिळा लावून घराबाहेर पडणार्‍या हिंदूंना खुलेआम मारझोड होते. मंदिरे किंवा अन्य कोणत्याही धार्मिक स्थळी जाणार्‍या हिंदूंना मारहाण होते. भगवा झेंडा लावण्यासही विरोध केला जातो. आता तर सरकारने उघडपणे सांगितले आहे की, भगवा झेंडा लावायचा असेल, तर त्याच्या बाजूला हिरवा झेंडाही लावावा लागेल. देशात अन्य राज्यांमध्ये हिंदू ज्याप्रमाणे धर्माचरण करू शकतात, तशी स्थिती केरळमध्ये नाही. केरळमधील काही स्थानांवर हिंदूंना सण साजरे करण्यास अनुमती नाकारलेली आहे. ‘येथे सण साजरे करू नका’, असे त्यांना उघडपणे सांगितले जाते.

३. सरकारच्या विरोधात बोलणार्‍याला सहन करावे लागतात अत्याचार !

मोगल आणि ब्रिटीश यांच्या काळातही जेवढे हिंदूंवर अत्याचार झाले नसतील, तेवढे अत्याचार सध्याच्या स्थितीत केरळमध्ये चालू आहेत, तसेच देशभरात होत नाहीत, त्याच्या अनेक पट हिंदुविरोधी कारवाया सध्या केरळमध्ये चालू आहेत. सरकारच्या धोरणाविरोधात बोलणारा किंवा न्यायालयात  याचिका करणारा पुढच्या २-३ दिवसांत कोणत्या तरी दुर्घटनेत मृत्यूमुखी पडतो. त्याच्या कुटुंबियांनाही त्रास दिला जात आहे. हे सर्व उघडपणे केले जाते. १५ वर्षांपूर्वी केरळ हे अत्यंत शांत राज्य होते. ही स्थिती गेल्या २ दशकांत निर्माण झाली आहे.

– कोण्णियूर पी.पी.एम्. नायर, आचार्य, केरलीय क्षेत्र परिपालन समिती, मुंबई (३०.१०.२०२३)