Goa Police : अतीवेगाने वाहन हाकणार्या ८ सहस्र ७०० चालकांचा परवाना रहित करण्याचा प्रस्ताव
पणजी, १७ नोव्हेंबर (वार्ता.) : अतीवेगाने वाहन हाकणार्या ८ सहस्र ७०० चालकांचा परवाना रहित करण्याचा प्रस्ताव गोवा पोलिसांच्या वाहतूक विभागाने सरकारच्या वाहतूक खात्याला पाठवला आहे. पोलीस अधीक्षक कौशल (वाहतूक) यांनी दिलेल्या माहितीनुसार वाहतूक खात्याने पोलिसांच्या वाहतूक विभागाने केलेल्या सूचनेवरून ऑगस्ट २०२३ पर्यंत ३ सहस्र जणांचे चालक परवाने (ड्रायव्हींग लायसन्स) रहित केले आहेत.
पोलीस अधीक्षक कौशल (वाहतूक) म्हणाले, ‘‘वाहतूक खात्याकडे चालक परवाने रहित करण्याचे एकूण ८ सहस्र ७०० प्रस्ताव आलेले आहेत, तसेच वारंवार वाहन चालवतांना भ्रमणभाष हाताळणारे एकूण २ सहस्र ५०० चालकांचे चालक परवाने रहित करण्याचा प्रस्ताव आलेला आहे.’’